पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारांनी बदलती माध्यमे व त्यांचे फायदे तोटे यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. डिजिटल मिडिया माध्यमांच्या सहाय्याने बातमीदारी करणे काहीशे सोपे पण तितकेच कठीण झाले आहे. माध्यमांची कक्षा जितकी रुंदावत आहे ती त्यापेक्षा जास्त संकुचित होत आहे. डिजिटल माध्यमातून बातमीदारी करणे खुपचं स्वस्त वाटत असले तरी व्यवहारीकदृष्ट्या न परवडणारी अशीच आहे. म्हणूनच हे क्षेत्र नविन बातमीदारांना आवाहन करत असले तरी ते प्रचंड आव्हानात्मक आहे. स्वराज्य वार्ता डिजिटल न्युज मिडिया या समुहाचा द्वितीय वर्धापनदिन नुकताच २ मे रोजी कृष्ण पिंगाक्ष प्रिमियम हॉल येथे संपन्न झाला. यात अनेक नविन प्रतिनिधी व बातमीदार यांना नियुक्ती पत्र व अधिकृत ओळखपत्र देण्यात आले.
खरपुडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेश गाडे यांची दिनांक २ मे रोजी स्वराज्य वार्ताचे बातमीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वराज्य वार्ताचे संपादक व मालक ॲड प्रितम रामदास शिंदे पा. यांच्या हस्ते राजेश गाडे यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सह संपादक व राज्य संचालक निलेश रसाळ हे देखील उपस्थित होते.