आळंदी घाटात प्रवाशांना लुटनारे चोरटे चाकण पोलीसांकडुन अटक

पुणे वार्ता:- रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणारे प्रवाशांना जबरीने लुटनारे चोरटयांना चाकण पोलीसांकडुन अटक, जबरी चोरीचे चार गुन्हयांची उकल

दि. ३०/०४/२०२२ रोजी रात्रौ १०:०० वा. चे सुमारास प्रविण धोंडु कोळी वय ४४ वर्षे धंदा नोकरी रा. आंबेठाण चौक, चाकण ता. खेड जि. पुणे हे नेहमी प्रमाणे आंळदी चाकण रोडणे कामावरून घरी येत असतांना मौजे मेदनकरवाड़ी गावाचे आळंदी रोडवर फॉरेस्ट परीसरात दोन अनोळखी इसमांना पाठीमागुन मोटार सायकलवर येवून चाकण जाण्याचे रस्त्याबध्दल विचारले असता त्यांनी त्यांचे स्कुटरचा वेग कमी केला असता सदर अनोळखी चोरटयांनी त्यांचे स्कुटरला पायाने लाथ मारून खाली पाडले व प्रविण कोळी यांना लाथा बुक्यांनी मारहाण करत त्यांचेकडील अॅक्टीव्हा स्कुटर नं एम एच १४ जी सी २७०४, रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम २५०० रु. तसेच त्यांचे एटीएम कार्ड व गाडीचे आसीबुक असा एकुण ५०, ५००/- रू. किंमतीचा मुददेमाल जबरीने चोरी करून आळंदी बाजुकडे पळुन गेले होते.

सदर घटने बाबत चाकण पोलीसांना माहिती मिळताच चाकण पोलीसांनी आळंदी रोडने गस्त करण्यास सुरुवात केली व आरोपींचा शोध घेत असतांनाच रात्रौ ११/१५ वा. चे सुमारास वरील आरोपींनी पुन्हा अशा प्रकारचे सावज शोधत अनिल कचरू मगर वय ३६ वर्षे धंदा नोकरी रा. केळगाव ता. खेड जि. पुणे हे रस्त्याने आळंदी बाजुकडे जात असतांना अनिल मगर यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत वरील अनोळखी इसमांनी त्यांचे मोटार सायकलला लाथ मारून खाली पाडुन त्यांना रस्त्याचे बाजुचे खडयात नेवून मारहाण करत त्यांचेकडरील सोनाटा कंपनीचे मनगटी घडयाळ व ५०००/- रू रोख रक्कम असे ७५००/- रू. चा मुद्देमाल जबरीने चोरी केला त्यावेळी जबरी चोरी करणारे दोन इसमापैकी एकाला अनिल मगर यांनी पकडुन आरडा ओरड सुरू केली असता सदर ठिकाणी रात्रगस्तीचे पोलीसांनी पकडलेल्या इसमास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रूपेश रामभाऊ जायभाय वय २० वर्षे रा. चाळीसफुटी रोड, आळंदी ता. खेड जि. पुणे असे सांगीतले. तसेच पळुन गेलेला त्याचा सहकारी शुभम बंडु भगत वय २१ वर्षे रा.सदर असे सांगीतले.

चाकण पोलीसांनी सदर शुभम भगत यास ताब्यात घेतले व दोन्ही आरोपींकडुन चोरीचा मुद्देमाल मोटार सायकल व मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल असा एकुण ९८,०००/-रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्यांचेकडुन आणखी दोन जबरीने चोरी केलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे.

फिर्यादी प्रविण प्रविण धोंडु कोळी यांचे फिर्यादी वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं ६८७ / २०२२ भादवि कलम ३९२, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच अनिल कचरू मगर यांचे फिर्यादी वरून गुरनं ६८८ / २०२२ भादवि कलम ३९२, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरील आरोपींना अटक करण्यात आलेली असुन

त्यांचेकडे केलेल्या तपासामध्ये त्यांचा सहकारी नामे नवनाथ आत्माराम हरीमकर वय २२ वर्षे, रा. पदमावती रोड, आळंदी ता. खेड जि. पुणे हा सुध्दा जबरी चोरीचे गुन्हे करण्यात त्यांचा सहकारी असल्याचे उघड झाले असुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. वरील आरोपींकडुन जबरी चोरीचे एकुण चार गुन्हयांची उकल झालेली आहे. एकुण १२५,०००/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे साहेब, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गाकयवाड पोसई सागर बामणे, सफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, राजू जाधव, पोना हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे, निखील शेटे, पोकॉ नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, निखील वर्पे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!