या अपघातात अंकुश राऊत , वय २६ वर्षे, रा. नाचोना यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दर्यापूर – महेश बुंदे
अंजनगाव दर्यापूर रोडवरील लेहेगाव फाट्यापुढे दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ९. ३०वाजताच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दोन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाली. या अपघातात एक जण जागेवरच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकीला (क्र. एमएच २७ एस ७८९३) समाेरून येणाऱ्या दुचाकीने (क्र.एमएच २७ सीएम ६११९) जबर धडक दिली.
या भीषण अपघातात दाेन्ही दुचाकी रोडवर पडल्या गेल्या, या अपघातात अंकुश राऊत, वय २६ वर्षे, रा. नाचोना यांचा जागेवरच मृत्य झाला. अपघात एवढा मोठा होता की, राऊत यांचा मेंदू अक्षरशः बाहेर पडला होता. अंकुश राऊत हा नाचोना ग्रामपंचायत मधील कर्मचारी असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. राऊत कुटूंबियावर घडलेल्या या दुःखद प्रसंगामुळे नाचोना वासीयांवर शोककळा पसरली आहे. तर इमरान खान रशीद खान , वय ३१, वर्ष रा. कापुसतळणी व शालिनी रहाटे, वय ४० वर्षे, रा. अंजनगाव शनिवार पेठ हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमींना दर्यापूर येथील साई बाबा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून, उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती दर्यापूर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

मदतीसाठी गोपाल अरबट आले धावून