चाकण वार्ता प्रतिनिधी लहू लांडे:- चाकण शहराच्या मध्यवस्तीतील एका शॉपिंग सेंटरला रविवारी (दि. 24 ) पहाटे तीन च्या सुमारास आग लागली. सुमारे तासाभरात हि आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तो पर्यंत हे संपूर्ण दुकान आगीत जाळून खाक झाले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.चाकण माणिक चौक रामकृष्ण कॉम्प्लेक्स येथील रामदेव शॉपिंग सेंटर या आगीत जाळून खाक झाले आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हि घटना स्थानिकांच्या लक्षात आली. तत्काळ चाकण नगरपरिषद अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत संपूर्ण दुकान आगीत भस्म झाले होते.

लगतच्या दुकानांना आगीची झळ पोहचू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे चाकण येथील वेदांत संकुल,रामकृष्ण कॉम्प्लेक्स, भागातील अन्य दुकाने वाचल्याचे प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी सांगितले. आगीत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले असले तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

