प्रतिनिधी सुनील भगवानकुरुळी( ता खेड )येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या बटवाल
खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात नावारुपाला व नावाजलेल्या कुरुळी (ता खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूकीत 13 जागासाठी बिनविरोध करण्यात करण्यात आली असून अध्यक्ष पदी रामनाथ किसन सोनवणे तर उपाध्यक्ष पदी कमल भरत कड यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस एम धारवड व सचिव चंदन पानसरे यांनी सांगितले .

कुरुळी( ता खेड )येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभाग्रहात निवडणूक निर्णय अधिकारी एस एम धारवड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदासाठी रामनाथ सोनवणे व उपाध्यक्ष पदासाठी कमल कड यांचे सर्वानुमते अर्ज दाखल करण्यात आले असल्याने अध्यक्ष पदासाठी रामनाथ सोनवणे व उपाध्यक्ष पदासाठी कमल कड यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस एम धारवड यांनी घोषित केले .
यावेळी संस्थेचे सचिव चंदन पानसरे संचालक काळुराम कड आशिष मु-हे बाजीराव बधाले हनुमंत गायकवाड नितीन गायकवाड संभाजी बागडे उत्तर सोनवणे साहेबराव कड जालिंदर वेताळ भाऊसाहेब कांबळे कल्पना डोंगरे यांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
