चिंबळी दि 23 वार्ताहर -सुनील बटवाल :- जि. प. शाळा बोरदरा येथे ‘ शाळापूर्व तयारी मेळावा ‘ उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी इयत्ता पहिलीस प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

बालकांची विनादडपण शारीरिक, बौध्दिक, भावनिक विकास चाचणी घेवून त्याचा प्रवेश निश्चित केला. या प्रसंगी प्रवेशापात्र विद्यार्थ्यांचे पालक, स्वयंसेवक, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व समिती सदस्य हजर होते. शाळा प्रमुख श्री. विजयकुमार तांबे तसेच सहकारी शिक्षक श्रीम. चांगुणा सोनवणे, श्रीम. मनिषा ठाकूर व श्रीम. संगिता माळवदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याने मेळावा हसत खेळत व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
