Post Views: 465
चिंबळी:- दि.23 वार्ताहर सुनील बटवाल
जिल्हा परिषद प्राथमिक हरितशाळा फडकेवस्ती येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगीतले .
मेळाव्याची सुरुवात नवागतांच्या वाजतगाजत मिरवणूकीने करण्यात आली.पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थांना फेटे व रंगीत टोप्या घालून फुगे देवून त्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले.
यावेळी हसत खेळत मुलांची बौध्दिक क्षमता,शारीरिक विकास, मानसिक विकास, गणितीय संख्याज्ञान ,याची चाचपणी विविध खेळाच्या माध्यमातून करण्यात आली.त्याचबरोबर पालकांना बालकाच्या शाळापूर्व तयारीबाबत, मुलाचे पहिले पाऊल हे पुस्तक व इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात विविध खेळाबरोबर,खास नवागतांच्या स्वागतासाठी बनविलेला फोटोचा, सेल्फी पाँईट मुलांचा आकर्षण बनला होता.
मेळावा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक अरुण गायकवाड ,शिक्षिका सिताबाई गेंगजे ,अंगणवाडी कार्यकर्ती लताबाई फडके यांनी परिश्रम घेतले.
मेळाव्यात नवागतांचे पालक ,विद्यार्थी,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब आल्हाट , सत्यवान फडके यांनी उपस्थिती लावली. सर्व विद्यार्थांना शिवाजी सूर्यवंशी व संदिप शिरोळे यांच्या कडून खाऊ वाटप करण्यात आले.