दर्यापूर – महेश बुंदे
शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या सत्याग्रहीनी दि. २१ / ४ /२०२२ च्या रात्री अकरा वाजता आग विझविण्यासाठी,जीव धोक्यात घालून, प्राणपणाने प्रयत्न केले. म्हणून ११० वर्षे जुना पण ठणठणीत पूल वाचला, अन्यथा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अभ्यासनिय असलेला, अनेक उन्हाळे, पावसाळे, मोठे नदीचे पूर अनुभवलेला वैभवी पुल आगीत भष्मसात झाला असता रात्री साडेदहा अकराच्या दरम्यान, शकुंतला प्रेमी दिनेश पारडे यांचा फोन विजय विल्हेकर यांना आला, त्यांनी सांगितले
चंद्रभागा नदीवरील रेल्वे पुलाला आग लागली आहे, विजय विल्हेकर यांनी लगेचच मूर्तिजापूरचे रेल्वे पोलीस निरीक्षक सत्येंद्र यादव यांना माहिती दिली, त्यांनी लगेच टीम घेऊन निघतो म्हणाले, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना कळविले, त्यांनी अग्निशमक दला सोबत संपर्क केला, अशा आपतकालीन परिस्थितीत अग्रेसर असणारे, आणि पुला नजीक बाग असणारे प्रदीप मलिये, कृष्णा मलिये यांना कळवताच ते वीस लिटरच्या पाण्याच्या कॅन डोक्यावर घेऊन, सहकाऱ्यांसह शुन्य मिनिटात हजर झाले, इतरही अनेक सत्याग्रही एका हाकेवर गोळा झाले, अंधारलेल्या उंच पुलावरून, डोक्यावर पाणी घेऊन, पुलाच्या शेवट पर्यंत चालत जाणे, जीवाची कसरतच होती. आग विझवतांना जी वाफ निघत होती, त्या वाफेने हात, पाय, अंग भाजत होते, त्याची तमा न बाळगता, जीवावर बेतून आग विझवली म्हणून ११० वर्षे अनेक उन्हाळे, पावसाळे,मोठे नदीचे पूर अनुभवलेला वैभवी पूल वाचला. नाहीतर अभियांत्रिकीचा अजोड नमुना, भस्मसात झाला असता.
