दर्यापूर – महेश बुंदे
उमरी कुरनखेड येथील यादव यांच्या घराला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. २१) रात्री घडली. अचानक लागलेल्या आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी यादव कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ही बाब दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे अहमदनगर येथे दौरा दरम्यान असताना कळली तेव्हा त्यांनी ‘त्या’ कुटूंबाला मदत देण्याचे ठरविले. यादव यांचे झालेले नुकसान बघता व आर्थिक परिस्थिती बघता मानवीयतेच्या दृष्टीने आमदार बळवंत वानखडे यांच्या मार्गदर्शनात आगीमध्ये झालेल्या नुकसानीची तात्काळ पाच हजार रुपयांची मदत शुक्रवारी २२ एप्रिल रोजी समाजसेवक रामूसेठ मालपाणी, इंजि. नितेश वानखडे, अनिरुद्ध वानखडे यांनी यादव यांच्या घरी जाऊन दिली आहे. त्यामुळे यादव यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
