दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर शहरात अकोट रोडला सिमेंट काँक्रीटचे मोठे रस्ते निर्माण झाले आहेत, रस्ते निर्माण होऊन बराच कालावधी उलटल्या नंतरही शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठान समोरील नाली बांधकाम रखडल्याने पाणी जमा झालेले आहे, जमा झालेल्या पाण्याच्या डबक्यात कीटक व मच्छरांची निर्मिती झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरण्याससाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, सदर नाली बांधकाम हे या महिनाभरात पूर्णत्वास गेले नाहीतर लोकांच्या घरामध्ये व प्रतिष्ठानामध्ये पाणी जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, अर्धवट नाली बांधकामामुळे व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे,
