प्रतिनिधी संदेश जाधव
चाकण-‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने चाकण शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्य काळात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कै.दत्तात्रय भिकोबा शिंदे ऊर्फ मामासाहेब शिंदे, कै.राजाराम गजानन सोरटे, कै.रघुनाथ सखाराम राऊत, कै.रामचंद्र महादेव गोरे ऊर्फ दादासाहेब गोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान केला व श्री.मधुकर रघुनाथ शेटे यांचाही यावेळी विशेष सन्मान केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य अमृत शेवकरी, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चिटणीस शाम पुसदकर, भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अजय जगनाडे, भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष प्रल्हाद परदेशी, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रतिक गंभीर, भाजपा महिला मोर्चा माजी तालुकाध्यक्षा रुपाली परदेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या स्तुत्य उपक्रमाचे राजेंद्र शिंदे, व्यंकटेश सोरटे, सम्राट राऊत, विशाल गोरे, राजेंद्र शेटे, किरण शेटे व प्रणव शेटे यांनी कुटुंबातील सदस्यांच्या वतीने स्वागत केले.
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सत्कार समारंभाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव व भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस शाम पुसदकर यांनी केले.



