चाकण | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य मोफत आरोग्य मेळावा आयोजित

चाकण वार्ता:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन गुरुवारी दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चाकण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या मेळाव्यामध्ये पात्र लाभार्थींना डिजीटल हेल्थ आयडी व आयुष्यमान भारत कार्ड तयार करुन देण्यात आले. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मेळाव्याची व्यवस्था रुग्णालयात केली आहे.

मेळाव्यामध्ये पात्र लाभार्थींना डिजीटल हेल्थ आयडी व आयुष्यमान भारत कार्ड ,तयार करुन देण्यात आले.यासाठी पासपोर्ट साईज दोन फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड यांचे मूळ कागदपत्र व त्यांच्या दोन प्रती झेरॉक्स व आधार लिंक मोबाईल नंबर घेण्यात आले. याबरोबर सर्व रोग मोफत तपासणी तज्ञ डॉक्डरांमार्फत होणार आहे. उदा. ह्दयरोग, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनीचे आजार, डोळ्याचे आजार (मोतीबिंदू), हाडांचे आजार, गरोदर माता व लहान मुलांचे आजार, कान-नाक-घसा, • दातांचे आजार, , क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही, आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार व आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबीरामध्ये रक्त, लघवी, एक्सरे, ईसीजी व इको या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत मोफत केल्या जाणार असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी शेकडो ग्रामस्थांनी या मेळाव्यास हजेरी लावली व लाभ घेतला यावेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर ,अधिकारी ,रुग्णालय कर्मचारी वर्ग, स्थानिक नगरपरिषद प्रशासन व कर्मचारी,पोलीस प्रशासन ,तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते ,संघटना ,सर्व पक्ष , आणि ग्रामस्थ त्यांचे विशेष सहकार्य लाभले

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!