चाकण वार्ता:- चाकणचा राजा श्री छत्रपतीनगर मित्र मंडळ,चाकण. यांनी रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त व अंगारकी चतुर्थीचा योग साधून दि.19 एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलीस बांधव व कर्मचारी वर्गाचा केला सन्मान.

चाकण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि सद्य परीस्थितीमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मा. आनंद भोईटे (डी.सी.पी. वाहतूक विभाग),मा. अनिल देवडे (गुन्हे शाखा .पी.आय.)मा. सुनिल गोडसे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मा.चौरे साहेब. वाहतूक विभाग चाकण आणि सर्व वाहतूक विभाग पोलीस कर्मचारी चाकण यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे खरंच बऱ्याच प्रमाणात या वाहतूक कोंडी पासून चाकण आणि चाकण परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अंगारकी चतुर्थी निमित्ताने मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन संपूर्ण टीम चे अभिनंदन केले आणि आभार मानले गेले.पुढील कार्यात आम्ही असेच सोबत राहू याबद्दल ग्वाही दिली.
कार्यक्रमासाठी चाकण पोलीस स्टेशन टीम आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.






