दर्यापूर – महेश बुंदे
उन्हाळा तीव्र होत असताना गावागावात पाणीटंचाई समस्या सुद्धा वाढत चालली आहे,वडनेर गंगाई येथे काही काही भागात पाच, सहा दिवस पाणी मिळत नाही, एवढच नाही तर त्यापेक्षा जास्त दिवस पाणी मिळत नाही, गावाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच यांनी मागे ३१ मार्चला आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते मात्र संबंधित अधिकारी आणि आमदार बळवंत वानखडे यांनी आठ दिवसात पाणी समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिल्याने तो आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला होता,

मात्र समस्यचे निवारण अद्याप पर्यंत झाले नाही, काही भागात आठ दिवस लागोपाठ पाणी मिळत नाही, त्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, उपसरपंच सौ. मोहिनीताई चंद्रशेखर ह्या येत्या २५ एप्रिलला जलत्याग आंदोलन करणार आहेत, अशा प्रकारचे निवेदन मजीप्रा अधिकारी दर्यापूर, पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर तहसीलदार यांना दिले असून त्याचबरोबर २५ एप्रिलला मुख्य टाकी येथील जल त्याग आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले,
