शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न

ब्युरो चीफ रवी मारोटकर

अमरावती वार्ता :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत शैक्षणीक संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले आहे. तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन अमरावती यांच्या संयुक्त विदयमाने विभागीय स्तरावर संस्थेच्या परिसरात पदविका अभ्यासक्रम निगडित तांत्रिक प्रोजेक्ट स्पर्धा दि. १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली.

सदर स्पर्धेसाठी अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यामधील तंत्रनिकेतनातील विध्यार्थ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये २१२ विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सध्यास्थितील अदयावत व प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत प्रोजेक्टचे सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये तंत्रज्ञानाची कास धरून भविष्यात लागणाऱ्या सुखसोयी तसेच शेती उद्योगाला लागणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.

या कार्यक्रमाच्या उद्धघाटनाप्रसंगी अध्यक्ष, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय अमरावती सहसंचालक डॉ. व्ही. आर मानकर हे होते. त्यांनी विध्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज कशी लागेल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे उद्धघाटक व प्रमुख पाहुणे डॉ. आशिष महल्ले प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय अमरावती हे होते. विध्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमामध्ये आपले कौशल्य कसे वापरून त्याचा समाजाला कसा फायदा होईल याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची सांगता बक्षिस वितरणाने करण्यात आली. या कार्यक्रमाला तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय अमरावती सहायक संचालक, प्रा एम. एम. अंधारे उपस्थित होते. प्रत्येक तांत्रिक शाखेच्या विजेता, उपविजेता व प्रोत्साहन पर असे बक्षिसे वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. पी. सिनकर मुख्य समन्वयक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सादिया राजा मॅडम यांनी केले. डॉ. जी. जी. सराटे समन्वयक यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सर्व विभागाचे वि.प्र. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्फुर्तपणे सहकार्य केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!