अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
येथील पोलीस स्टेशन नजीक असलेल्या बालाजी चौकात व्यंकटेश प्लाझा मधील व्हिजन आप्टीकलला दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी ४:३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत आप्टीकल मधील सर्व साहित्य जळून भस्मसात झाले तसेच लागलेल्या आगीमुळे आजू बाजूला असणाऱ्या बऱ्याच दुकानांना या आगीची झळ पोहचली.
बालाजी चौकात व्यंकटेश प्लाझा मध्ये अ. मतींन अ. गफूर यांचे मालकीचे व्हिजन ऑप्टिकलचे दुकान आहे, या आप्टीकललासकाळी अचानक आग लागली. आगीमुळे दुकानातील कॉम्पुटर, डोळे तपासणी मशीन, प्रिंटर,खुर्ची, फर्निचर, नुकताच आणलेल्या नवीन चष्मेचा माल व इतरही साहित्य जाळून खाक झाले. आगीची माहिती रमजान महिना असल्यामुळे सकाळची नमाज करुन येणाऱ्या काही नागरिकांना काही जळत असल्याचा वास आल्याने त्यांनी व्यकंटेश प्लाझा मध्ये पाहिले असता त्यांना आग लागली असल्याचे निदर्शनात आले त्यामुळे दुकान मालक व अग्निशमन दलाला याची माहिती दिली. ह्या मध्ये अंदाजे १० ते १२ लाखाचे नुकसान झाले आहे.
