मालखेड येथे हेडा रूट कॅनल अँड इंप्लान्ट सेंटर अमरावतीचे आयोजन,शेकडो गावकरी रुग्णांनी घेतला लाभ
प्रतिनिधी आकाश वरघट
चांदूर रेल्वे :- तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात मालखेड येथे संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नारायनदासजी हेडा यांच्या स्मृती दिनानिमित्त हेडा रूट कॅनल अँड इंप्लान्ट सेंटर अमरावती तर्फे रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉ. दर्शन हेडा आणि इंप्लान्ट स्पेशालिस्ट डॉ सायली हेडा या तज्ञ डॉक्टरांनी मोफत दंत तपासणी शिबिराचे भव्य आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये शेकडो गावकरी रुग्णांनी तथा शाळेतील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून गावात या शिबिराची प्रशंसा केली जात आहे. सदर कार्यक्रमाचे संचालन जवंजाळ मॅडम तथा आभार प्रदर्शन प्राचार्य आशिष देशमुख सर यांनी केले.
“मालखेड येथील मोफत दंत शिबिरा मध्ये लाभ घेणाऱ्या समस्त रुग्णांना किंवा आपल्या परिवारातील कोणालाही दाताचे काही प्रॉब्लेम असतील अशा सर्वांना शिवलहरी हॉस्पिटल अमरावती येथे तपासणी करण्यात येईल तपासणीअंती ज्या रुग्णांना दाताचे प्रॉब्लेम असतील त्यांना योग्य सल्ला देऊन तथा औषधोपचार सुद्धा सूट देऊन करण्यात येईल”
-डॉ. दर्शन हेडा रूट कॅनल स्पेशालिस्ट (एम डी एस)

“व.रा.तू.म. विकास संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नारायणदासजी हेडा यांच्या स्मृतीदिनी आपले सामाजिक दायित्व जपत व हेडा परिवाराचा समाजसेवेचा वारसा कायम ठेवत त्यांचे परिवारातील सर्वांनी नेहमीच गावाकरिता विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे या मोफत दंत तपासणी शिबिराच्या माध्यमातून हेडा परिवाराने नारायणदास हेडा यांच्या पावन स्मृतीस उजाळा दिला,यासाठी त्यांचे आभार”
- आर एस देशमुख
सचिव, व.रा.तू.म.विकास संस्था,मालखेड रेल्वे
