कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा आठवले यांचा जीवन प्रवास असून त्यांच्या विषयी बोलणारांनी स्वतःचा आवाका बघून मगच टिका करावी ; देखणे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचेवर टिका करणारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव हरिष देखणे यांनी उत्तरादाखल कर्तुत्व पाहून बोलण्याचा सल्ला दिला. कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा रामदास आठवले यांचा जीवन प्रवास असून त्यांच्या विषयी बोलणारांनी स्वतःचा आवाका बघून मगच टिका करावी असे देखणे म्हणाले.

रामदास आठवले यांनी प्रस्थापित समाज व पक्षांशी प्रसंगी संघर्ष करुन उपेक्षितांना सत्तेत वाटा देणेस प्रवृत्त केले. रामदास आठवले यांच्यामुळे उपेक्षित समाजाला नेतृत्व संधी मिळाली. अनेक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, नगरसेवक, उपनगराध्यक्ष झाले. अनेकांना महामंडळे व शासकीय कमिट्यांमध्ये काम करायची संधी मिळाली. नुकत्याच झालेल्या मणिपूर निवडणूकीत प्रस्थापित पक्षांविरुद्ध लढत देत रिपाई उमेदवार अवघ्या दिडशे मतांनी पराभुत झाला. रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री असून देशभरातील उपेक्षित समाजाचे नेतृत्व ते करत आहेत.

सत्ता विरोधात संघर्ष करताना कार्यकर्ते टिकवून त्यांनाही सत्तेत सहभागी करुन नेतेपद देण्याची किमया आठवले यांनी करुन दाखविली. गल्लीबोळात आठवलेंबद्दल टिकटिप्पणी करणारे संकटात व अडचणीत आठवलेंचाच आधार घेतात. राज्य व केंद्र सरकारकडून काम करुन घेण्याची क्षमता आठवलेंकडे आहे. सत्ता व पक्ष कोणताही असो कामावेळी आठवलेंचा शब्द डावलला जात नाही.

वंचित समाजातून अनेक नेतृत्व उभी राहिली पण टिकली नाहीत हे वास्तव आहे. रि. पा. इं.आठवले हे एकमेव आहे जे प्रस्थापित समाज व पक्ष यांच्यासमोर टिकले आहेत. संघर्षा बरोबरच वाटाघाटी करण्याची कसब असणे खूप गरजेचे असते. म्हणूनच इतिहासात युद्धात जिंकणे यापेक्षाही तहात जिंकणाऱ्या कुटनितीला अनन्य साधारण महत्व आहे. असे विचार रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सचिव हरिष देखणे यांनी व्यक्त केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!