पोकरा प्रकल्पा अंतर्गत सरपंच यांची कार्यशाळा संपन्न

दर्यापूर – महेश बुंदे

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत दर्यापूर येथे ग्राम कृषि संजिवनी समिती अध्यक्षांची कार्यशाळा आमदार बळवंत वानखडे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ यांचे अध्यक्षतेखाली व किसन मुळे विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. कार्यक्रमाला डॉ. सुभाष टाले निवृत्त संचालक, कृषि पद्धती व पर्यावरण केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात आमदार बळवंत वानखडे यांनी पोखरा प्रकल्पात शेवटच्या दोन वर्षात उपस्थित सर्व सरपंचांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रकल्पाची प्रसिद्धी करून जलस्तर वाढविण्याचे तसेच विविध घटकांतर्गत लाभ पोहोचविण्याचे व गटांच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी पोकरा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बदलत्या हवामानाची व अनिश्चित पावसाची दखल घेऊन १०० टक्के शेतकऱ्यांनी शेततळ्याचा लाभ घेऊन संरक्षित सिंचन करून उत्पादन वाढवावे व आवश्यकते नुसार मृद व जलसंधारणाची कामे करून जमिनीची धूप थांबवण्याचे व जलस्तर वाढविण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुभाष टाले यांनी पोकरा प्रकल्प हा खारपाण पट्ट्यासाठी वरदान असून मृद व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्याचे आव्हान केले.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान यांनी विविध योजनांची माहिती देऊन गटामार्फत लाभ घेण्याचे आवाहन केले. अरविंद नळकांडे यांनी पोकरा प्रकल्पाचे माध्यमातून जलस्तर वाढविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी राजकुमार अडगोकर यांनी खरीप हंगाम सन २०२२-२३ पूर्व नियोजन बाबत माहिती देऊन खरीप हंगाम २०२२ करीता सोयाबीन जतन कार्यक्रम राबवून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी करीता सोयाबीन बियाणे राखून ठेवलेले असल्याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल देशमुख कृषि सहाय्यक यांनी व आभार प्रदर्शन मनोज कुमावत कृषि सहाय्यक यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रगतिशील शेतकरी, रिर्सोस बँकेचे शेतकरी, पिक स्पर्धा विजेते, उपविभागीय कृषि अधिकारी विजयजी पथाडे, नायब तहसीलदार मते मॅडम, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सुधीर अरबट, अॅड. अभिजीत देवके, मंडळ कृषि अधिकारी सचिन राठोड, घनश्याम कळस्कर, कृषि पर्यवेक्षक प्रमोद खर्चान, प्रशांत अरुळकर, अशोक राणे, कृषि सहाय्यक व महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!