दर्यापूर – महेश बुंदे
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित रत्नाबाई राठी हायस्कूल व शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ एप्रिल रोजी “कलाजत्था” एक आनंदायी शिबिराचे मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न झाले.
या शिबिराला उदघाटक म्हणून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे उपस्थित होते. तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ. रामचंद्र नारायण शेळके, प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. केशवराव गावंडे, सामाजिक कार्यकर्ते सौ.भारतीताई काळे, शेखर पाटील विदर्भ प्रमुख शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, प्रल्हादराव कृष्णराव मुळे आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. भदे, तांडेकर माजी नगरसेवक, शिबीर प्रमुख गजेंद्र पाटील व वैभव ठाकरे, शिबीर प्रशिक्षक वाझिर शहा, मंगला लाजूरकर याची उपस्थिती प्रार्थनीय होती. शिबिराचे उदघाटन बॅटबिटन कोर्टचे पूजन करून व श्रीफळ फोडून तसेच फीत कापुन करण्यात आले. अथर्व गारोळे व दुर्गेश सोनाळेकर यांनी टायकांडो खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
