मानव जाधव याची धनुर्विद्या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी,३९ व्या एन.टी.पी.सी सब ज्युनिअर आर्चरी स्पर्धेत मिळविले सिल्वर मेडल

दर्यापूर – महेश बुंदे

नुकतेच राजस्थान येथे पार पडलेल्या ३९ व्या एनटीपीसी सब ज्युनिअर आर्चरी स्पर्धेत-२०२२ दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील रहिवासी व सध्या बुलढाणा येथे शिकत असणारा चि. मानव गणेशराव जाधव याने सिल्वर मेडल महाराष्ट्र संघाला पटकावून दिले आहे. पुढील काळात अमेरिकेत आयोजित १५ दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातून एकमेव मानव जाधव याची निवड झाली आहे.


या आधी जम्मूकाश्मीर येथे दि. २५ ते २७ मार्च रोजी पार पडलेल्या सिनिअर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र संघात मानव जाधव याची निवड झाली होती. या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक प्राप्त केले होते. मानव जाधव हा बुलढाणा येथील शिवबा आर्चरी अकॅडमीमध्ये चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आहे,तो शारदा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे.

मानव आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक, महाराष्ट्र आर्चरी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सदानंद जाधव व मित्र परिवार यांना दिले आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील काही कालावधीतच तो भारताचे नेतृत्व आतरराष्ट्रीय स्तरावर करेल यात शंका नाही, त्याच्या या यशाबद्दल त्याचे त्याच्या या यशाबद्दल दत्ता जळमकर, डॉ.गोपाल जऊळकार, प्रा.डॉ. देवीलाल आठवले, प्रा.निलेश जळमकर, पुरुषोत्तम बावणेर, प्रकाश महल्ले यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!