मोक्का पाठोपाठ लगेच दुसरी धडाकेबाज कामगिरी, खेड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा दारू विक्री करणारे केले १ वर्षासाठी जेरबंद, एम.पी.डी.ए. कायदयांतर्गत कारवाई

पुणे वार्ता :-ता. ३०/१० / २०२१

मोक्का पाठोपाठ लागलीच दुसरी धडाकेबाज कामगिरी, खेड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा दारू ब्रिकी करणारेस केले १ वर्षासाठी जेरबंद, एम.पी.डी.ए. कायदयांतर्गत कारवाई, या कारवाईमुळे नक्कीच वाढत्या गुन्हेगारीला बसणार आळा.

पुणे शहरालगत असणारे खेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औदयोगीकीकरण झालेले आहे. याचा औदयौगीकीकरण क्षेत्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके काढून तसेच इतर बेकायदा व्यवसाय करून गैर मार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यासाठी दहशत निर्माण करून करीत असतात.

अशा गुन्हेगारांना वेळीच आळा घालून त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख मा. डॉ. अभिनव देशमुख सर, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी दिलेले आहेत. त्या अनुशंगाने श्री. सतिशकुमार गुरव पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन यांनी खेड पोलीस (स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांवर बसणेसाठी गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. त्यापाठोपाठ लागलीच नियीमत बेकायदा तयार हातभट्टीची दारू काढून ती दारू विक्री करणारे

इसमांची यादी तयार केली. त्यामध्ये इसम नामे सुरेश जयसिंग राठोड वय ४९ वर्षे रा. ठाकरवस्ती नानेकरवाडी ता.खेड जि. पुणे याचेवर बेकायदा दारूविक्री करणे याबाबत ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याने श्री. पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांचे निदर्शनास आले. वरील गुन्हयातील आरोपी सुरेश जयसिंग राठोड वय ४९ वर्षे रा. ठाकरवस्ती नानेकरवाडी ता. खेड जि. पुणे याचेविरुध्द खेड पोलीस स्टेशन येथून ए.पी.डी.ए कायदयांतर्गत प्रस्ताव तयार करून

सदर प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सारे, पुणे यांचेकडे सादर करण्यात आला होता. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सो, पुणे यांनी सदर प्रस्तावामधील इसम नामे सुरेश जयसिंग राठोड हा “हातभट्टीवाला व्यक्ती” या सदराखाली त्यास १ वर्षे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले.

त्यानंतर सुरेश जयसिंग राठोड यांस खेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेवून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यास मध्यवर्ती कारागृह पुणे येथे जमा करण्यात आले.

सदरची कामगिरी ही मा. डॉ. अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक, मा. मितेश गट्टे सो अपर पोलीस अधिक्षक पुणे, मा. मंदार जावळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग, सतिशकुमार गुरव पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन, अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्था.गु. शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली खेड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार संतोष घोलप, दत्तात्रय जगताप, सचिन जतकर, बाळकृष्ण भोईर, शेखर भोईर, संदीप चौधरी, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, योगेश भंडारे, सागर शिंगाडे, प्रतिक खरबस यांचे पथकाने केली आहे.

तसेच मा. सतिशकुमार गुरव पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन यांनी येथून पुढे देखील कोणी वर्चस्वासाठी तसेच आर्थिक प्राप्तीसाठी बेकायदा व्यवसाय करून दहशत निर्माण करेल यांचेवर देखील कडक कारवाई करणार आहे. तसेच आणखी सराईत गुन्हेगांरावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगीतले यामुळे नक्कीच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!