विस्तार अधिकारी जाधव व कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक प्रकाश मारोटकर यांचा केला सत्कार
ग्रा प कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळी पूर्वी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार साजरी
नांदगाव खंडेश्वर/ओम मोरे
नांदगाव तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन 10 महिण्यापासून थकीत असल्यामुळे आणि दिवाळी 15 दिवसांवर आली असतांना वेतन मिळण्याची शक्यता कर्मचाऱ्यांना दिसत नसल्याने आपली कैफियत कर्मचाऱ्यांनि युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांना सांगितली त्यावर त्यांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांचे टेबलवर दिवाळीचे दिवे पेटवून अनोखे आंदोलन करून तात्काळ दिवाळी पूर्वी वेतन देण्यात यावे अन्यथा पंचायत समिती कार्यालयात दिवाळी साजरी करू असा इशारा दिला होता याची दखल घेत विस्तार अधिकारी जाधव साहेब यांनी सर्व ग्रा प कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन देण्याचे पत्र ग्रामसेवकाना देऊन सतत त्याचा पाठपुरावा जाधव साहेब यांनी घेतल्यामुळे आज वेतन मिळाले .
त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी कुटुंबासह साजरी होणार असल्याने आनंद व्यक्त करत जाधव साहेब व प्रकाश मारोटकर यांचे आभार मानून शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन चे तालुका अध्यक्ष अमोल पां मेटकर.सागर भाऊ गोंडाणे गणेश भाऊ भाकरे.राहूल दुर्गे.शरद घाटोळे. अमोल जाधव.अंकुश गांडोळे.विनोद राऊत प्रकाश भाऊ फरकाडे.पवण चौके या वेळी हजर होते.
