चाकण शहरातील विविध ठिकाणी गटारांची झाकणे अद्यापही उघडी व तुटलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान ड्रेनेज दुरुस्तीकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो मात्र तरीही हि समस्यां कायम असल्याने वाहनचालक, नागरिकांचे आरोग्य व जीव धोक्यात आले आहे.उघड्या ड्रेनेज रहदारीसाठीही धोकादायक ठरत आहेत.

अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहे. तसेच रात्री-अपरात्री वाहनचालक अथवा पादचारी या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कित्येक वेळा पादचारी त्या मध्ये पडून त्याना मोठी दुखापत झाली आहे. त्याचच एक उदाहरण पुणे नाशिक महामार्गावर वाघे वस्ती जवळील ड्रेनेज वर झाकण नसल्याने शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाली.

अनेकदा मागणी करूनही संबंधित धोकादायक ड्रेनेज तसेच सताड उघडे असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. प्रशासनाला या बाबत नेमकी कधी जाग येणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शेवटी वैतागून आरती हॉटेलचे मालक सागर बनकर यांनी पूना नाशिक हायवे वरती वाघे वस्ती येथे ड्रेनेज ओपन असल्यामुळे अपघात होतात म्हणून तिथे सेफ्टी पोल स्वखर्चाने बसवण्यात आले.आता ह्यावर प्रशासन झाकण कधी बसणार हेच आता पहावं लागेल.
