दिवाळीच्या प्रकाश पर्वात शहरात नांदतेय विकास पर्व व्हीएमव्ही परिसरात १.३८ कोटींच्या विविध विकास कामांचे आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण मूलभूत सुविधा व आमदार निधी अंतर्गत विकास कामांचा धडाका
अमरावती ०१ नोव्हेंबर : सद्या दिवाळीची चाहूल लागली असून प्रकाशपर्व साजरा करण्याला घेऊन शहरवासियांमध्ये लगबग दिसून येत आहे. घरोघरी साफसफाई व रंगरंगोटी करण्यासह रोषणाई केली जात असतांना त्यात आ. सुलभाताई खोडके यांनी विकासात्मक कामांची पूर्तता केल्याने शहरात दिवाळीच्या प्रकाशपर्वात आता विकासपर्व देखील नांदत असल्याचे दिसत आहे. याच शृंखलेत व्हीएमव्ही भागातील विविध अनेक निवासी भागात आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते १.३८ कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली .
निवडणूक पूर्व काळात केलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासह विकासाच्या कृती कार्यक्रमावर अंमल करतांना आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी पायाभूत विकासाच्या पूर्ततेतून मानव विकासावर भर दिला असल्याने विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक भागाचा कायापालट होतांना दिसत आहे . याबद्दल स्थानिक नागरिकांचे वतीने आ. सौ . सुलभाताई खोडके यांचा सत्कार करीत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . याप्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देतांना आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी सांगितले की , जनतेत जो विश्वास दर्शविला व सेवेची संधी दिली . त्याबद्दल आभारी आहे.कोरोनाची गंभीर स्थिती असतांना सुद्धा आपण सर्व याला मोठ्या धाडसाने सामोरे गेलो , दरम्यान विकासाची मालिका अबाधित राहावी म्हणून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने काम करण्याची ऊर्जा मिळत गेली . शहरात विकास कामांचे लोकार्पण होत असतांना मनस्वी आनंद होते असून पुढेही कुठलीही समस्या उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्यास आपण अहोरात्र झटणार असल्याच्या विश्वास आ. सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला . बॉक्स
मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांच्या विशेष अनुदानातील लोकार्पित कामे (किंमत लाखांमध्ये )
१. सौरभ कॉलनी ते साई मंदिर शाकुंतल कॉलनी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण – किंमत अंदाजे ३४.२७ २. डॉ.पंजाबराव देशमुख कॉलनी मधील दोन नालीचे बांधकाम -किंमत अंदाजे २०.०० लक्ष व १२.७९ लक्ष. ३. डॉ .पंजाबराब देशमुख कॉलनी मध्ये रस्त्याचे बांधकाम – किंमत अंदाजे १४. ९० लक्ष ४. भेटाळू लेआऊट सावजी रेस्टारेंट ते ग्रामसेवक भवन पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम – किंमत अंदाजे २०.०० लक्ष ५. पुंडलिक बाबा नगर नवसारी भागातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम – किंमत अंदाजे- २०. ०० लक्ष आमदार निधी शीर्षाखालील लोकार्पित विकास कामे १. महर्षी कॉलनी येथील नालीचे बांधकाम – किंमत अंदाजे ६ .८० लक्ष २. डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी येथील अंतर्गत नालींचे बांधकाम – किंमत अंदाजे – ७. २० लक्ष ३. नवसारी पुंडलिक बाबा नगर येथील रस्त्यांचे खडीकरण किमंत २. ५० लक्ष