दर्यापूर – महेश बुंदे :-
तालुक्यातील कळमगव्हाण ग्रामपंचायतची नुकतीच ग्रामसभा संपन्न झाली. या सभेमध्ये गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी ऑडो. अभिजित देवके यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
दर्यापूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक मागील सहा महिन्यांच्या आधी पार पडली पण कोरोना नियमामुळे ग्रामसभा झाल्या नसल्याने गावागावात अनेक समित्या स्थापन करण्यात आलेल्या नव्हत्या, आता ग्रामसभेला मान्यता भेटल्याने पाच वर्षाचा कार्याकाळ पूर्ण झालेल्या तंटामुक्ती समितीची नवीन कार्यकारणी गावागावात जाहीर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील कळमगव्हान येथील कुशल नेतृत्व, दर्यापूर तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय, कृषी क्षेत्रात कार्यरत असणारे, अमरावती जिल्हा कॉग्रेस कमिटीचे महासचिव तथा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी बांधकाम सभापती ऑडो. अभिजित देवके यांची कळमगव्हान ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे दर्यापूर तालुका कॉग्रेस कमिटी, प्रेस क्लब, पॉवर ऑफ मीडिया व मित्र परिवार यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.