आमदार राजेंद्रजी पाटणी यांच्या नेतृत्वात,बकारंजा तहसीलवर भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्याकरिता भव्य आसूड मोर्चाचे आयोजन

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम :- दिं 2 नोव्हेंबर रोजी भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांचा अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी व निद्रिस्त व आंधळ्या सरकारला जागृत करण्यासाठी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन तहसील कार्यालयवर करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी झाशी राणी चौकात दुपारी 1 वाजता यावे व मोर्चात सामील व्हावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री .राजेंद्रजी पाटणी करणार आहेत.


कारंजा तालुक्यातील शेतकरी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे व शहराध्यक्ष ललीत चांडक यांनी केले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले .

कापूस, सोयाबीन व ईतर पीकांचे नुकसान भरपुर प्रमाणात झाले परंतु या सरकारला जाग आली नाही.राज्य सरकारने अल्पशा कोटींची मदत जाहीर केली परंतु आपल्या जिल्यातील शेतकऱ्यांना मदत नाही गावं वगळलीत तेव्हा या मुक्या, बहिऱ्या सरकारला जागृत करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता 2 नोव्हेंबर 2021 च्या शेतकऱ्यांच्या भव्य आसूड मोर्चात मोठया संख्येने शेतकऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राजेंद्रजी पाटणी साहेब यांनी केले आहे. मोर्चात मागण्या कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा,सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रमाणे मदत द्या,2019-20 व 2020-21 या दोन्ही पीक विमा शेतकऱ्यांना द्या. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी शेतकऱ्यांना बिलं भरण्याची सक्ती करण्यात येत आहे ती सक्ती बंद करण्यात यावी अशा व ईतर मागण्या आहेत.

तरी भाजपा सर्व आघाड्या ,युवा मोर्चा, महिला मोर्चा, शेतकरी आघाडी, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोर्चात सहभागी व्हावे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मोर्चा आयोजक भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे व शहराध्यक्ष ललित चांडक यांनी केले आहे. असे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!