बातमी संकलन – महेश बुंदे
संपुर्ण विश्वाला स्वच्छतेचा महामंत्र देणारे, वैराग्यमुर्ती गाडगेबाबांनी आपल संपुर्ण आयुष्य गोरगरीब, अंध, अपंग, निराश्रीतांच्या सेवेसाठी खर्ची घातले. अहोरात्र भ्रमंती करत किर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अंधश्रध्देचा संदेशदेत स्वत: हातात खराटा घेवून स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले. प्रामुख्याने श्री गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपत, तरुण पिढीली व घरा घरापर्यंत गाडगेबाबांचा दहाकलमी संदेशाचा प्रसार व प्रचार व्हावा, या उदात्त हेतून श्री गाडगेबाबांच्या प्रतिरुप सेवार्थ प्रचार वाहनातून श्री क्षेत्र नागरवाडी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबे़डकर स्मारक चैत्यभूमी दादर पर्यंत संत गाडगेबाबा संदेशयात्रा व स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आले.
अशी माहिती संदेशयात्रेचे प्रमुख बापूसाहेब देशमुख यांनी यावेळी दिली. या श्रृखंलेत संत गाडगेबाबा संदेशयात्रा नाशिक येथे श्री गाडगेबाबांनी आपल्या हयातीत रामनवमी व चैत्रशुध्द एकादशीला सुरु केलेल्या गाडगे महाराज धर्मशाळेत अंध,अपंग सदावर्ताच्या ८६ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याकरीता दाखल झाले होती. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छता अभियान राबवित करण्यात आली. यानंतर नाशिक येथिल घाटोळ परीवार व श्री.बाजीराव तिळके यांचे विशेष सहकार्यातून एकादशीला गोरगरीब, अंध, अपंग, वृध्दामायबापांना सुदंर फराळ देण्यात आले. यामध्ये द्राक्ष, चिकू, केळी,गुळ-शेंगदाने, वेफर्स, फराळी चिवडा, राजगिरा लाडू, तसेच पुरुषांना ब्लॅंकेट, महिलांना सुंदर साड्या, सतरंजी, टॉवेल, सोलापुरी चादर, ईत्यादींचे माजी जिल्हा क्रिडाधिकारी सानप व सोनल साळी यांचे शुभहस्ते मोफत वितरणाचा भव्यदिव्य असा वर्धापनदिन सोहळा या ठिकाणी पार पडला.
