दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथील उपजील्हा रुग्णालयात दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते २ दरम्यान आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवाने हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले हे होते,
प्रमुख उपस्थितीत तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, माजी वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर हे होते. कार्यक्रमाची मुख्य भूमिका वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष डाबेराव यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली. सदर कार्यक्रमासाठी तालुकाआरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र रहाटे, तज्ञ म्हणून डॉ. टाले स्त्री रोग तज्ञ, डॉ. टाले, डॉ. तायडे रेडियोलोजिस्ट, डॉ. भूषण कट्टा बालरोग तज्ज्ञ, डॉ. शाम देते स्त्री रोग तज्ज, अस्थी रोग तज्ञ म्हणून डॉ. पवार, वैद्यकीय अधीक्षक ग्रारू चिखलदरा, शल्य चिकित्सक म्हणून डॉ. ढोले वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, दंत रोग तज्ज्ञ डॉ. इंगळे, आयुष तज्ज्ञ डॉ. विलास मेश्राम, भुलरोग तज्ज्ञ डॉ. बदुकले, भिषक डॉ. जढाळ यांनी काम सांभाळले सोबतीला डॉ. गुल्हाने, डॉ. राठोड, डॉ. कोरडे यांनी अथक परिश्रम घेतले, शिबिरा करिता इन्चार्ज सिस्टर ढोरे, सपकाळ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
