मदर डेअरी व दुग्ध विकास विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मदर डेअरी प्रा ली अंतर्गत दूध संकलन केंद्र सुरू करणेबाबतची आढावा बैठक आज तहसील कार्यालय दर्यापूर येथे पार पडली. दर्यापूर तालुका खारपाण पट्टयाचा असून सिंचनाची सोय नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसाय तसेच रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने दूधविकासाला चालना मिळणे आवश्यक आहे. त्या अनुशंघाने दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या विनंतीने सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरु करणेबाबत १० एप्रिल २०२२ रोजी अमरावती येथे बैठक पार पडली .
