पिण्याच्या पाण्यात आढळला नारूसदृश्य कृमी,आरोग्य विभाग घटनास्थळी दाखल

नारूसदृश्य कृमी आणी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले लॅबला ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात,आरोग्य विभागाने लक्ष देन्याची गरज

प्रतिनिधी फुलचंद भगत


मंगरुळपीर लगतच्या जांब ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या डेरेकाॅलनीमध्ये खडसे नावाच्या व्यक्तीच्या बोअरवेलच्या पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.यामुळे नागरीकांचे आरोग्य बिघडन्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याने आरोग्य विभागाने त्वरीत लक्ष देण्याची गरज असल्याचे वृत्त प्रकाशीत होताच आरोग्य विभागाची टिम घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला.

आजुबाजुंच्या बोअरवेलच्या पाण्याचे नमुनेही घेतले तसेच सदर नमुने व नारूसदृश्य कृपी तपासणीसाठी लॅबला पाठवले आहेत. मंगरुळपीर लगतच्या जांबरोडवरील डेरेकाॅलनीमधील खडसे यांनी बोअरवेलमधुन पाणी भरले.सदर पाणी बकेटमध्येही भरले असता त्या बोअरवेलमधुन बकेटीतल्या पाण्यात नारूसदृश्य कृमी असल्याचे लक्षात आले.

ही बाब लगेच परिसरातील नागरीकांना समजताच पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.शासनाने नारूचे ऊच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले असतांना असा पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्यामुळे नागरीकांमध्ये आरोग्याविषयी भिती निर्माण झाली आहे.

आरोग्य विभागाने याबाबीची गंभीरतेने दखल आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सिएचओ डाॅ.अश्विन गोडबोले,आरोग्य सहाय्यक शेख अल्ताफ शेख जामिन,आरोग्य सेवक जि.पी.शिंदे,आशा वर्कर लता भगत,सरपंच साहेबराव भगत,ग्रामसेविका सिमा सुर्वे घेवुन घटनास्थळ गाठले.सदर बोअरवेलमध्ये ब्लिचिंग पावडर टाकुन पाणी शुध्द करण्याची प्रक्रीया केली.आजुबाजुंच्याही बोअरवेलच्या पाण्याचे नमुने घेवुन व सदर नारुसदृश्य कृमी पुढील तपासणीसाठी लॅबला पाठवले.ग्रामप्रशासनाने परिसरातील शासकीय पानवठे तसेच खाजगी बोअरवेलच्याही पाण्याची तपासणी करुन ब्लिचिंग पावडर टाकावे व लोकांना यासंदर्भात जनजागृती करावी.नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवु नये म्हणून त्वरीत ऊपाययोजना कराव्यात अशी मागणी आता नागरीकांमधून होत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!