सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने महाजलसाचे आयोजन

शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक गाण्यांचा कार्यक्रम

प्रतिनिधी फुलचंद भगत


मंगरूळपीर:-स्थानिक मंगरूळपीर तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते जयंतीच्या अनुषंगाने शहरात प्रबोधनपर गाण्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा नवयान महाजलसा कार्यक्रम दि. 20 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे .

सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.वनपरिक्षेत्र अधिकारी सिद्धार्थ देवरे यांना बोलवण्यात आले उद्घाटक म्हणून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना आमंत्रित केले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे व मानसोपचार तज्ञ डॉ.नरेश इंगळे व समाजकल्याण सभापती वनिता देवरे यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युवा नेते सौरभ सपकाळ, ऊपसभापती गजानन इंगोले,विनोद भगत,जनार्दन बेलखडे,गौतम खाडे यांनी सदर कार्यक्रमाची माहिती दिली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!