बिटोडा भोयर येथील आनंदी पेट्रोलपंपावरील पिस्तुल दाखवून कॅश लुटणाऱ्या तीन आरोपींना आसेगांव पोलीसांनी केले अटक

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-दि. 01/03/2022 रोजी सायंकाळी 07.30 वा. मंगरूळपीर ने वाशिम रोड वरील बिटोडा भोयर येथील आनंदी पेट्रोलपंपाचे कामगार गौतम विठ्ठल खंदारे हे एकटेच असतांना, काळया रंगाची पल्सर कंपनीची मोटार सायकलवर २५ ते ३० वयोगटातील तीन ईसम तोंडाला बांधुन आले .

त्या विमांनी प्रथम ५० रू व पुन्हा ३०० रु. में पेट्रोल टाकुन घेतले आणि पेट्रोलचे पैसे दिले गौतम खंदारे हे पैसे मोजत असतांना त्या तिपापैकी एकानेगौतम खंदारे यांचे गळ्यात हात टाकुन पकडुन, त्याच्या जवळील पिस्तुल (देशी कट्टा) गीतम खंदारे यांचे डोक्याला लावली तेव्हा दुस-याने गौतम खंदारे यांचे गळयात असलेली पैशाची बॅग व त्यातील १४,००० / रू. जबरीने हिसकावुन काढून घेतली आणि ते तिथे त्या मोटार सायकलवर बसुन वाशिम रोडने भरधाव वेगाने पळून गेले.

यावरून पोलीस स्टेशन आसेगांव अप. क्र. 52/2022 कलम 397, 34 भादंवि सहकलम 3, 25 आर्म्स अॅक्ट अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मा. बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम, मा. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक वाशिम व मा. यशवंत केडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर यांनी सदर गुन्हयाची गांभीर्याने दखल घेउन आरोपींचा शोध घेण्याकरिता मार्गदर्शक सुचना दिल्या. आरोपी नामे (1) सर्जेराव ऊर्फ प्रिन्स रोहीदास होलपदे, वय 22 वर्षे, रा. करंजी ता. वसमत जि. हिंगोली, (2) देवानंद ऊर्फ लखन बालाजी दुधमोगरे, वय 21 वर्षे, रा. खांडेगांव, ता वसमत, जि. हिंगोली (3) राजु एकनाथ चव्हाण, वय 21 वर्षे, रा. खांडेगांव, ता. वसमत, जि. हिंगोली यांना ताब्यात घेउन दि. 16/04/2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे.

सदरच्या आरोपींकडे विचारपुस केली असता, त्यांनी एकत्रितपणे याच प्रकारचे (1) अर्धापुर पोलीस स्टेशन, जि. नांदेड हद्दीतील पद्मावती पेट्रोलपंपावर जबरी चोरी केली. (2) लिंबगांव पोलीस स्टेशन, जि. नांदेडहद्दीतील वैशालीताई पावडे पेट्रोलपंपावर जबरी चोरी केली. (3) महागांव पोलीस स्टेशन, जि. यवतमाळ हद्दीतील दत्त पेट्रोलपंपावर जबरी चोरी केली. (4) पोलीस स्टेशन मानवत, जि. परभणी हद्दीतील रुद्रीपाटीजवळ कैलास पेट्रोलपंपावर जबरी चोरी केली. वर नमुद सर्व गुन्हयांची कबुली दिली. सदरचे गुन्हे केल्यानंतर ते फरार झाले होते.

सदरची कामगिरी मा. बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम, मा. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक वाशिम व मा. यशवंत केडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनाखाली आसेगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि, संदीप नरसाळे, पोउनि, रविकिरण खंदारे व पोलीस शिपाई गणेश बर्गे यांनी पार पाडली.

इतर ठिकाणी पेट्रोल पंप लुटले त्याचा तपशिल

१)महागाव:-४५,५०० Rs.
२)आसेगाव:-१४,००० Rs.
३)लिंबगाव जि.नांदेड:-२१,०००
४)मानवत:-१ लाख Rs.
५)अर्धापुर:-२ लाख Rs.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!