सरकारी पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे रक्षकच झालेत भक्षक..
अमरावती प्रतिनिधी /ओम मोरे
एल्गार सेना अमरावती जिल्हा तथा सर्व दाढी पेढी येथील अन्यायग्रस्त पीडित शेतकरी यांनी दिनांक 18/2022 रोजी जिल्हाधिकारी मॅडम अमरावती जिल्हा यांना निवेदनाद्वारे माहिती दिली की,दिनांक ०४/०४/२०२२ रोजी नीता लबडे तहसीलदार तथा दंडाधिकारी मॅडम भातकुली यांच्या समक्ष शेतकऱ्यांकडून न्यायाकरीता निवेदनाद्वारे दाढी पेढी गावातील तलाठी सतीश बाबाराव कळसकर, कोतवाल लता राजू तेलमोरे व राजू रामभाऊ लेंडे कृषी मित्र यांनी केलेल्या काही कारनामे निदर्शनास आणून देण्यात आले.
मात्र त्यांना या प्रकरणी तहसीलदार यांचा आशीर्वाद मिळाल्याने अद्यापही कुठलीही कार्यवाही केली नाही .आणि त्या दरम्यान राजस्व कर्मचारी यांच्या संप पुकारला होता मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रभारी नायब तहसिलदार वानखेडे यांच्या कडे सदर निवेदनाद्वारे माहिती कळविण्यात आली होती.तेव्हा त्यांनी आपल्या समस्येचे निराकरण अवघ्या दोन ते तीन दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन उपस्थित एल्गार सेना अमरावती जिल्हा यांच्या पदाधिकारी व पीडित शेतकरी बांधव यांना देण्यात आले.
मात्र अद्यापही शेतकरी बांधव यांना कुठलीही प्रतिक्रिया किंवा न्याय आपल्या अधिकाऱ्याकडून मिळाला नाही.तेव्हा आपण सदर समस्येचे निवारण करून तत्काळ दखल घेऊन पीडित १०८ शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैशाची रक्कम जमा करून ग्राम दाढी पेढी येथील आपल्या पदाचा गैरवापर करणारी तलाठी कोतवाल व कृषी मित्र यांना तत्काळ निलंबनाची कारवाई करून शेतकरी बांधव यांना न्याय द्यावा अशी विनंती आम्ही एल्गार सेना अमरावती जिल्हा व पीडित शेतकरी बांधव यांच्या वतीने निवेदन देऊन आपल्या समक्ष करीत आहोत.तरी आपण सदर समस्येचे निवारण तत्काळ न केल्यास पुढील कठोर पवित्रा संघटना तसेच पीडित शेतकरी बांधव घेण्याचा मानस सर्वानुमते ठरविण्यात आला आहे.
तेव्हा आपण आपल्या पातळीवर तत्काळ दखल घेऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे.अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.निवेदन देतेवेळी गजानन मानमोडे,जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा, डॉ.राधास्वामी काळे प्रदेश महासचिव ,महाराष्ट्र राज्य ,शेतकरी बांधव शंकर पचारे,सुरेश भोंगडे,सुरेंद्र भोंगडे,भाऊराव मठ्ठा ,मधुकर कलाने,सुभाष गणेश,महादेव तेलमोरे,गजानन मानमोडे आणि मोठ्या संख्येने एल्गार सेना कार्यकर्ता त्यावेळी उपस्थित होते.