MIDC परिसरात मोटार सायकल चोरी करणा-या सराईत दोन गुन्हेगारांना महाळूंगे पोलीसांनी ठोकल्या बेडया

प्रतिनिधी लहू लांडे

पुणे वार्ता:- पिंपरी चिंचवड परिसरातील मोटार सायकल चोरी वर आळा घालण्याकरिता गुन्हयांचे क्राईम मॅपिंग करुन, नाकाबंदी व पेट्रोलिंग करुन गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश सो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी दिल्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, महाळुंगे पोलीस चौकी यांनी गुन्हे तपास पथक, महाळुंगे पोलीस चौकी यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत व क्राईम मॅपिंग करुन पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्याचे आदेशित केले.

त्यानुसार स.पोनि गुळीग यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदारांनी वारंवार चोरी होणा-या ठिकाणांना भेटी देवुन मोटार सायकल चोरी गुन्हे घडले तारीख, वेळ, ठिकाण पडताळणी करुन गुन्हयांची काईम मैपिंग तयार करण्यात आले त्यानुसार विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी व पेट्रोलिंग आयोजित करण्यास सुरुवात केली..

दिनांक ११/०४/२०१७ रोजी सपोनि गुळीग, पो.ना.ब.नं. १८४० काळे, पो.ना.ब.नं. १४१३ बिराजदार, पो. शि.ब.नं. २३११ लोखंडे, महाळुंगे पोलीस चौकी असे मोटार सायकल चोरी गुन्हे प्रतिबंध होणेकामी पेट्रोलिंग करत मोई चिखली रोड येथे दोन इसम हे बजाज पल्सर घेवुन चिखली कडुन मोईच्या दिशेने येताना दिसले त्याचे मोटर सायकल चे पुढील बाजुस नंबर प्लेट नसल्याने त्याचे बाबत संशय आल्याने त्यास हाताने थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळून जावुन लागले असता त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यात असलेल्या बजाज पल्सर मो.सा. नंबर MH14JN1704 बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली .

त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरची गाडी हि दिनांक १०/०३/२०२२ रोजी हॉटेल तुळजाभवानी शेजारी, गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड जि. पुणे येथुन चोरली असल्याचे सांगितल्याने स.पोनि गुळीग यांनी लागलीच महाळुंगे पोलीस चौकी येथे सदर मोटार सायकल बाबत फोनवरुन अभिलेखावरुन माहिती घेतली असता सदरची मोटार सायकल चोरीबाबत चाकण पोलीस स्टेशन अंकीत महाळुंगे पोलीस चौकी गु.र.नं. ३७०/२०२२ भा.द.वि.क. ३७९ अन्वये अज्ञात चोरटया इसमाविरुध्द गुन्हा दाखल असुन त्याचा तपास पो.हवा.ब.नं. १३९९ गाडीलकर, महाळुंगे पोलीस चौकी हे करीत आहेत.

वगैरे माहिती फोनवरुन मिळताच स.पोनि गुळीग व पथकाने मोटार सायकलवरील दोन्ही इसम नामे १) अक्षय प्रभाकर कणसे, वय २४ वर्षे सध्याचा पत्ता सोनु कडप यांचे खोलीत कुरुळी, ता. खेड जि. पुणे मुळगाव राधेराधे जनरल स्टोअर्स जवळ, डोंगरे निवास समोर, प्रकाशनगर, ता. जि.लातुर २) योगेश मोहन सुर्यवंशी, वय २६ वर्षे, रा. सध्याचा पत्ता सोनु खडप याचे खोलीत, मु. पो. कुरुळी ता. खेड जि. पुणे मुळपत्ता साई रोड, नांदगाव, नांदगाव सेन्ट्रल जेल जवळ, ता. जि. लातुर यांना व त्यांचे ताब्यातील मोटार सायकल बजाज पल्सर मो. सा. नंबर MH14JN1704 असे ताब्यात घेवून त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने पोलीस कस्टडी घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी अजुन चार मोटार सायकली चोरल्या असल्याचे सांगितले.

नमुद आरोपी यांनी चोरलेल्या मोटार सायकली जप्त केला त्या खालीलप्रमाणे

पोलीस ठाणे महाळुंगे पोलीस चौकी :-

1)एम एच १४ जी एफ ७२१९ किंमत अंदाजे-
४०,०००/ रुपये
2) एम एच १४ एच बी २७२२ किंमत अंदाजे -३०.०००/ रुपये
3) एम एच १३ जे एन १७०४ अंदाजे किंमत १,१०,०००/रुपये

दिघी पोलीस स्टेशन

4)एम एच १४ डी ई ९६८७ अंदाजे किंमत २०,०००/ रुपये


चाकण पोलीस स्टेशन

5) एम एच १४ ए एफ ०८५५ अंदाजे किंमत १५,०००/रुपये

अशा एकुण ५ मोटार सायकली जप्त किंमत २,१५,०००/- रुपये

यात मोटार सायकल चोरी करणारे अटक केलेले आरोपीं : १) अक्षय प्रभाकर कणसे, वय २४ वर्षे सध्याचा पत्ता सोनु कडप यांचे खोलीत कुरुळी, ता. खेड जि. पुणे – मुळगाव- राधेराधे जनरल स्टोअर्स जवळ, डोंगरे निवास समोर, प्रकाशनगर, ता. जि. लातुर २) योगेश मोहन सुर्यवंशी, वय २६ वर्षे, रा. सध्याचा पत्ता सोनु खडप याचे खोलीत, मु.पो. कुरुळी ता. खेड जि. पुणे मुळपत्ता साई रोड, नांदगाव, नांदगाव सेन्ट्रल जेल जवळ, ता. जि. लातुर

कंपनीतील कामगारांना आवाहन याद्वारे एमआयडीसी मधील कंपन्यामधील कामगारांना आवाहन करण्यात येते की, कामगारांनी आपल्या मोटार सायकली कंपनीच्या आवारात कंपाऊंडच्या आत योग्य सिक्युरिटी / सीसीटीव्ही निगराणी खाली लावण्यात याव्यात तसेच मोटार सायकलीला मेटल टायर लॉक लावावे व हॅन्डल लॉक करुन पार्क कराव्यात जेणेकरुन कंपनी आवारामधुन होणा-या चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे,मा. पोलीस उप-आयुक्त श्री. मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री दशरथ वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पो.उपनि किरण शिंदे, पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, गोरख गाडीलकर, अशोक जायभाये पोना संतोष काळे, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अजय गायकवाड पो.कों शिवाजी लोखंडे,बाळकृष्ण पाटोळे महाळुंगे पोलीस चौकी यांनी केली आहे. पुढील तपास पो हवा. गाडीलकर, महाळुंगे पोलीस चौकी हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!