महाळुंगे पोलीस चौकी कारवाई: चाकण एमआयडीसी हद्दीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याच्या पाईप लाईनचे पाईप चोरुन नेणारे चार इसम ताब्यात घेवून त्यांचेकडुन] १०.३५,०००/- रुपये किंमतीचे पाईप जप्त
विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे
चाकण वार्ता :- चाकण पोलीस स्टेशन अंकीत महालुगे पोलीस चौकी गुरनं. ५४१/२०२२ मा.द.वि.क. ३७९ मधील फिर्यादी नामे राजेश देवदत्त कुलकर्णी, वय ५० धंदा नौकरी शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रं.३ पुणे, रा. श्वेता सोसा प्लॅट नं. १०. डहाणूकर कॉलनी, कोथरूड पुणे यांनी फिर्यादी दिली की,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे १३,५०,०००/- रूपये किंमतीचे डी आय के १ या प्रकारचे पाईप एकुण १२० नग, १६ ते १८ फुट लांबीचे काळ्या रंगाचे, त्यावर आय एस आय असे लिहीलेले असे वर्णनाचे पाईप दिनांक ०८/०४/२०२२ रोजी १७/०० वाजता ते दिनांक १०/०४/२०२२ रोजी १५/०० वा. थे दरम्यान मौजे खराबवाडी, वाघजाईनगर ता. खेड, जि. पुणे येथे पाण्याचे टाकीजवळून कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वतःचे फायदयाकरीता चोरून नेले म्हणुन तक्रार दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हा हा शासकीय मालमत्ता चोरीचा गंभीर स्वरूपाचा असुन सदरबाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे पोलीस चौकी यांनी तात्रीक विश्लेषणाव्दारे व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत तपास पथकास आदेशित केले होते.
सदर दाखल गुन्हयाचे तपासात दिनांक १३/०४/२०२२ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिक विश्लेषणा व्दारे माहिती प्राप्त झाली की, चाकण पोलीस स्टेशन अंकीत महाळुंगे पोलीस चौकी गु.र.नं. ५४१/२०२१ मा.द.वि.क. ३७९ मधील चोरीस गेलेला माल १) अमोल अर्जुन गोरे (वय २८ वर्षे, रा. सभा वालेकर यांच्या घरामध्ये भाडयाने वालेकरवाडी, ता. हवेली जि. पुणे मुळगाव मु. पो. शेळगाव ता. परांडा जि. उस्मानाबाद), २) हनुमंता संगाप्पा कट्टिमणी, (वय ३२ वर्षे धंदा प्लंबर, रा. नागशेणनगर झोपडपट्टी बिजलीनगर, पुणे मुळगाव मु.पो. आंद्रळ ता. सुरापुर जि. यादगिरी राज्य कर्नाटक), ३) अतिश राजाभाऊ कांबळे, (वय २२ वर्षे धंदा प्लंबर, रा. निसर्ग हाऊसिंग सोसायटी, गजानन वाल्हेकर याचे घरामध्ये भाडयाने, वाल्हेकरवाडी, ता. हवेली जि. पुणे मुळगाव मु.पो. घारगाव ता. कळंब जि. उस्मानाबाद ),४) सुंदर दोदाप्पा दोडमणी, (वय ३३ वर्षे बिजलीनगर गुरव्दारा रोड, पीसीएमसी वॉटर टैंक समोर नागसेन नगर, चिंचवड, पुणे महाराष्ट्र मुळगाव मुपो तितण ता. सुरापुर जि. यादगिरी राज्य कर्नाटक) यांनी केल्याची माहिती प्राप्त झाल्याने
त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता सदर गुन्हा त्यांनी केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन सदर गुन्हयात चोरीस गेलेल्या पाईपापैकी १०,३५,०००/- रुपये किंमतीचे डी आय के ९ या प्रकारचे एकूण ९२ नग १६ ते १८ फुट लांबीचे काळया रंगाचे पाईप जप्त करण्यात आले आहेत.
व पोलीस ठाणे महाळुंगे पोलीस चौकी मध्ये भा.द.वि.क. ३७९.३४ नुसार गुन्हा दाखल करून यात अटक आरोपी
१) अमोल अर्जुन गोरे, वय २८ वर्ष, रा. सभा वालेकर यांच्या घरामध्ये भाडयाने वालेकरवाडी, ता. हवेली जि. पुणे मुळगाव मु.पो. शेळगाव ता. पराडा जि. उस्मानाबाद २) हनुमता संगाप्मा कट्टिमणी वय ३२ वर्षे, धंदा प्लंबर, रा. नागशेणनगर झोपडपट्टी बिजलीनगर, पुणे मुळगाव मु.पो. आंद्रळ ता. सुरापुर जि. यादगिरी राज्यकर्नाटक ३) अतिश राजाभाऊ कांबळे, वय २२ वर्षे, धंदा प्लंबर, रा. निसर्ग हाऊसिंग सोसायटी, गजानन वाल्हेकर यांचे घरामध्ये भाडयाने, वाल्हेकरवाडी, ता. हवेली जि. पुणे मुळगाव मु.पो. घारगाव ता.कळंब जि उस्मानाबाद ४) सुंदर दोदाप्पा दोडमणी, वय ३३ वर्षे, बिजलीनगर गुरव्दारा रोड, पीसीएमसी वॉटर टैंक समार नागसेन नगर, चिंचवड, पुणे महाराष्ट्र मुळगावमुपो. तितण ता. सुरापुर जि. यादगिरी राज्य कर्नाटक
आवाहन
याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते की, कंपनी परिसरामध्ये सिक्युरिटी गार्ड नेमावेत तसेच सी सी दि व्हि कॅमेरे व लाईट लावाव्यात तसेच कंपनी परिसरामध्ये संशयित इसम फिरताना मिळुन आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा त्यामुळे कंपनीमधील चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री दशरथ वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पो.उपनि किरण शिंदे, पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, पो.ना संतोष काळे, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अमोल निघोट पोकों/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे यांनी केली आहे.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक किरण शिंदे, महाळुंगे पोलीस चौकी हे करीत आहेत.