उदगीर येथे संपन्न होणार ९५ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन
दर्यापूर – महेश बुंदे
कवी,लेखक,साहित्यिक यांना आपली कला सादर करण्यासाठी अनेक कार्यक्रम,संमेलन ही संधी असते,लहान कार्यक्रम पासून सुरू झालेली प्रगती कधी तरी या मराठी भाषेतील सर्वात मोठे साहित्य संमेलन असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचमध्ये आपल्याला संधी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील युवा कवयित्री कु.आचल काळे हिला अखिल भारतीय साहित्य संमेलनात आपली मनसोक्तपणे बरसणारा पाऊस” ही कविता म्हणण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
उदगीर येथे संपन्न होणाऱ्या ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ती आपली रचना सादर करणार आहे,तसे पत्र तिला प्राप्त झाले,प्रसिद्ध,अनुभवी,जेष्ठ अशा साहित्यिक समोर कविता म्हणायची तिला ही सुवर्ण संधी मिळाली आहे.
कवयित्री कु.आचल ज्ञानेश्वर काळे (काव्यांचल) ही सोनोरी(ब) ता.मूर्तिजापूर जि.अकोला येथील रहिवासी असून दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात ती बीकॉम शाखेत अंतिम वर्षाला शिकत आहे. कु.आचल काळे ही शब्दवेल साहित्य समूहाची सदस्य,युवती संघटन प्रमुख,शब्दवेल युथ विंग, आणि सह संचालिका मनस्पर्शी साहित्य परिवार म्हणून कार्य करत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता सादर करणे,हे माझं एक प्रकारे स्वप्न होत आणि गंमत म्हणून जेव्हा मी यावर्षीच्या संमेलनासाठी मी माझी कवीता पाठवली आणि खरचं अगदी मराठी नूतन वर्षाच्या दिवशी मला इतकी आनंददायी बातमी एका फोन कॉलद्वारे मिळाली आणि अतिशय आनंद झाला.
