प्रबोधन विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर – रवी गणोरकर
दर्यापूर – महेश बुंदे
आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थी मैदानापासून दूर गेला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे,त्यामुळे कमी वयात मुलांना आजार होतात,यापासून मुलांना वाचवायचे असेल तर त्याच्या मनामध्ये खेळाची आवड निर्माण झाली पाहीजे, व त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी,याच उद्देशाने प्रबोधन विद्यालयाच्या वतीने ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा शिबिराचे आयोजन केले आहे,असे प्रतिपादन विदर्भ प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष रवी गणोरकर यांनी केले,ते ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दर्यापूरचे तहसीलदार योगेशजी देशमुख,ठाणेदार प्रमेशजी आत्राम,सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक अशोकराव हिरुळकर व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता हिरुळकर,महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर,उपप्राचार्य नरेंद्र गोंडाणे,उपमुख्याध्यापिका सौ. श्रीनाथ मॅडम,पर्यवेक्षक कु.भिसे व सौ.संत मॅडम आदी उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक अशोकराव हिरुळकर व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता हिरुळकर यांनी विद्यालयाला ५०००० रू. देणगी देऊन त्यातून उत्तम साऊंड सिस्टिम निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार अध्यक्ष रवी गणोरकार यांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आला.
