दर्यापूर – महेश बुंदे
जगभर सर्वत्र लोक झाडे लावण्यासाठी, जगवण्यासाठी धडपडतात. ती पर्यावरणाची आजची गरज आहे. परंतु दर्यापूर तालुक्यातील रामागड ते नांदरून आणि रामागड या रस्त्यावरील (दर्यापूर – करतखेड या नांदरून मार्गावर मात्र विपरीत घडत आहे. या रस्त्यावरील वाढलेली झाडे काही अज्ञात लोक पेटवून देत आहेत.
रस्त्याच्या बाजूचे शेतकरीच ही झाडे संपवण्यासाठी हे विघातक आणि पर्यावरण विरोधी कृत्य करीत आहेत असल्याचे तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी सांगितले. इतर कुठेच आग लागत नसताना, नेमक्या रस्त्याच्या कडेच्या झाडाभोवतीच का आगी लागाव्यात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, खरे तर, पर्यावरणप्रेमी रामागडवासी आणि शासनाच्या अथक प्रयत्नांतून ही हिरवीगार झाडे वाढली होती.
