प्रतिनिधी लहू लांडे
चाकण शिक्रापूर रोडवर टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये टेम्पो चालक ठार झाला आहे. बहुळ गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि.15) हा अपघात झाला.नितीन दत्तात्रय पिंगळे (वय 47 वर्षे.रा. चाकण)असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

सागर नितीन सोनवणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, एमएच 46 एआर 1767 या कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
