इंद्रायणी नदी पात्रात ,औद्योगिक वसाहतीत सांडपाणी व ऑईमिश्रीत पाणी सोडले जात आहे.

चिंबळी दि १५( वार्ताहर सुनील बटवाल) श्री क्षेत्र आळंदी व देहू या पुण्यभूमी मधुन वाहत असलेल्या इंद्रायणी नदी पात्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली परिसरातील औद्योगिक वसाहतीत सांडपाणी व ऑईमिश्रीत पाणी सोडले जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढले असुन जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

तर मोशी चिंबळी हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेल्या ४० वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या के टी बधा-याच्या परिसरात तीन ते चार किलो मिटर जलपर्णी वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असुन डासांचे प्रमाण वाढले आहे परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून बधा-याच्या मो-या मधुन साबणा सारखे पांढरे शुभ्र पाणी निर्माण होऊन वाहत आहेत. व त्या पाण्याचा दुर्गंधी पण येत आहे.यामुळे पाणी अशुद्ध होउन नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे . तसेच स्थानिक प्रशासन ,स्थानिक पुढारी नेते मंडळी,व आरोग्य प्रशासन नुसती बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. व सरकारची स्वच्छ सुंदर अभियान हे फक्त कागदावरच आहे का ? असा नागरिकांमधून सवाल उपस्थित होत आहे .आता या वरती आरोग्य प्रशासन काय भूमिका घेते हेच पहावं लागेल .

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!