दर्यापूर – महेश बुंदे
कोकर्डा रस्त्यावरील येत असलेल्या भाटोका नाला जवळ तसेच पुढील रस्त्याच्या कडेस अज्ञाताने आग लावल्याने त्यात वाढीच्या वृक्षांची होळी होत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. खाक झालेली वनसंपदा पाहून वृक्ष प्रेमिंचा जीव कासावीस होत असून या अज्ञाताला शोधून त्याचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व निसर्गप्रेमींकडून होत आहे.

(दि. १५) शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वाढीच्या वृक्षांची होळी होत असतानाही वन विभागाचे कसलेही लक्ष याकडे नसल्याने वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात मुख्यता शुक्रवार बाजाराचा दिवस असून येणाऱ्या जाणाऱ्यां वाहतूकधारकांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला.
