प्रतिनिधी फुलचंद भगत
मंगरूळपीर:-तालुक्यातील मानोली येथे समता सैनिक दलाने पंचशिल ध्वजाला सलामी देत महामानवाला अभिवादन केले.ग्रामपंचायत सरपंचा तसेच समता सैनिल दलाच्या प्रमुख यांच्या मुख्य नियोजनात बौध्द विहारामध्ये हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती प्रित्यर्थ मौजे मानोली येथे जयंती ऊत्सवाचे आयोजन समता सैनिक दल तसेच ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते.विहारामध्ये बुध्दवंदना घेवुन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.समता सैनिक दलाकडुन पंचशिल ध्वजाला सलामी देण्यात आली.मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत महामानवाच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.शेवटी अन्नदान करुन या जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
