दर्यापूर – महेश बुंदे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर विलास मेश्राम यांच्या संकल्पनेतून रुग्णालयातील गरोदर माता, बालके व महिलांना दूध, बिस्कीट, फळे वाटप करण्यात आली. या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष डाबेराव, डॉक्टर तिरुपती राठोड, डॉक्टर गुंजन गुल्हाने, डॉक्टर विलास मेश्राम, डॉक्टर बदुकले, डॉ. कोरडे, डॉक्टर साखरे, डॉक्टर इंगळे, डॉक्टर पावडे, एम. पी. डब्ल्यू पवार, सुबोध फुटाणे, आरोग्य मित्र सतीश आवारे, राजू वाकपांजर, आरोग्य निरीक्षक प्रभाकर कुकलकर आदी उपस्थित होते.

“जीवनात अनेक लोकांना एक वेळचा आनंद देखील भेटत नाही. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच माझी तरुणाईला आवाहन आहे की, आपणच उद्याचे भविष्य आहात. सामाजिक भान जपणे हे आपल्या हातात आहे. आपला अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालय, दुष्काळग्रस्त, शेतकरी, शाळा, अंध, दिव्यांग अशा सर्व गरजूंना मदत करा. जेणेकरून आपण सामाजिक भान जपण्याचे महान कार्य हातून घडेल.”
— डॉ. विलास मेश्रा
