दर्यापूर – महेश बुंदे
शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह व विविध सामाजिक, व्यापारी, शैक्षणिक संस्थाच्या वतीने शकुंतला रेल्वे “आहे त्या स्थितीत” सुरु झाली पाहिजे, यासाठी सत्याग्रह सुरू आहेत, गेल्या शहिद दीनापासून शहिद होत असलेल्या शकुंतला रेल्वेला वाचवण्यासाठी एक लाख स्वाक्षरी महाअभियान राबविण्यात येत आहे. स्वाक्षरी सत्याग्रहाला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

त्याचाचच एक भाग म्हणून दिनांक १४ एप्रिल २०२२ सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी बनोसा रेल्वे स्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व भगवान महावीर जयंती निमित्त, या महामानवाच्या प्रतिमा छातीवर लावून, शकुंतला रेल्वेचा प्रश्न, उजागर करण्यासाठी व स्वाक्षरी मोहिमेला गती देण्यासाठी जलवृक्ष चळवळ, गाडगेबाबा पर्यावरण महिला मंडळ, सभ्यता स्फोर्ट्स व सर्व पक्ष, संघटनांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी १ में महाराष्ट्र दिनी, वंचीत विदर्भाची “माय शकुंतला एक्सप्रेस” तात्काळ सुरू व्हावी. यासाठी सर्व रेल्वे स्थानकावर ध्वज संचलन व स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कार्यक्रम चारही जिल्ह्यातील सर्व शकुंतला रेल्वे स्थानकावर राबविण्यात येईल असेही ठरले.
