चाकण पोलीसांनी १२तासाच्या आत चारीत्राचे संशयावरून पत्नीचा गळा चिरून खुन केलेल्या आरोपीस सातारा जिल्हयातील माण तालुक्यातुन अटक

चाकण वार्ता:- दि. १२/०४/२०२२ रोजी पहाटे ०५:०० वा. चे सुमारास मौजे मेदनकरवाडी गावाचे हददीत हनुमंत भिकाजी मेदनकर यांचे अनंता हाईट या इमारती मधिल रूम नं. ४ मध्ये सचिन रंगनाथ काळेल वय ३० वर्षे हा त्याची पत्नी आश्विनी सचिन काळेल, वय २५ वर्षे व मुली श्रावणी वय ७ वर्षे, श्रेया वय ५ वर्षे व परी वय ३ वर्षे यांचेसह राहत असतांना सचिन काळेल याने त्याची पत्नी अश्विनी हिचे चारीत्र वर घे त्या कारणावरून वाद करून पत्नी अश्विनी हिचा अतीशय निर्धुन पणे चाकुने गळा कापुन खुन केला होता. सदरचा प्रकार त्यांची ७ वर्षाची मुलगी श्रावणी हिचे समोर घडलेला होता. पत्नीचा खुन करून आरोपी सचिन काळेल हा राहते घरातुन पळुन गेला. सदर घटने बाबत खोली मालक हनुमंत भिकाजी मेदनकर यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून चाकण पोलीस स्टेशन गुरनं ५३३ / २०२२ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर गंभीर गुन्हयाबाबत चाकण पोलीसांना माहिती मिळताच चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांचेसह चाकण पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी गुन्हे तपास पथकातील सपोनि प्रसंन्न जन्हऱ्हाड यांचे अधिपत्याखाली दोन पथके तयार करून आरोपीस तात्काळ गुन्हयात अटक करण्याच्या सुचना दिल्या.

तपास पथकाला गोपनिय बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी सचिन काळेल हा गुन्हा केल्यानंतर सातारा जिल्हयाकडे त्याचे शाईन मोटार सायकलवर पळून गेलेला आहे. सदर आरोपीचे शोधकामी चाकण पोलीस स्टेशन कडील डि. बी. पथक रवाना केले.

अतिशय शिताफीने सदर आरोपीस पो. ना. भांबुरे व पो. कॉ. गायकर यांनी ताब्यात घेतले. व आरोपी सचिन रंगनाथ काळेल यास सातारा जिल्हयातुन अवघ्या १२ तासात सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, श्री. डी.बी. पतंगे साहेब यांनी दिनांक १८/०४/२०२२ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि प्रसंन्न ज-हाड, पोसई सागर बामणे, सफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, राजू जाधव, पवन आहेरकर, पोना हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे, निखील शेटे, बजरंग साबळे, दत्तात्रय बिराजदार, पोकॉ प्रदिप राळे, चेतन गायकर, उध्दव गर्जे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि प्रकाश राठोड हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!