पिंपरी चिंचवड वार्ता:- दिनांक १४/०४/२०२२ महाळुंगे पोलीस चौकी हद्दीत पॉलिमर प्रेसिजन, चाकण आळंदी रोड, कुरुळी, ता. खेड जि. पुणे मधुन दिनांक ०७/०४/२०२२ रोजी सकाळी ११/०० ते ०८/०४/२०२२ रोजी सकाळी ०७/५० वाजताचे दरम्यान पॉलिमर प्रेसिजन, चाकण आळंदी रोड, कुरुळी, ता. खेड जि. पुणे कंपनीचे शटरचे लॉक तोडुन शटर उघडुन आत मध्ये प्रवेश करून लबाडीच्या इरादयाने १) २७,०००/- रुपये किंमतीचे डिजिटल हाईटगेज २) ०२,२००/- रुपये किंमतीचे वजनकाटा पाच किलो कॅपासिटीचा ३) २०,५००/- रुपये किंमतीचे इंटेल कंपनीचा संगणक सीपीयु, मॉनिटर युपीएस (४) ०६.३०० /- रुपये किंमतीचे इपॅक्ट मशिन ५) ०१,०००/- रुपये किंमतीची इलेक्ट्रिक शेगड़ी ६) ०१,६५०/- रुपये किंमतीचे स्टार्टर ७) ०७,५००/- रुपये किंमतीचे प्लॅस्टिक गोणीचे शिलई मशीन असा एकूण ६६,१५०/- रुपये किंमतीचे व वर्णनाचे माल चोरुन नेला आहे.
म्हणुन सुभाष दुर्गाचरण महापात्रा, वय ४५ वर्षे धंदा खाजगी नोकरी, रा. फ्लॅट नं. ६०६, बिल्डींग सी, सारा सिटी खराबवाडी ता. खेड जि. पुणे यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात इसम चोरटयाविरुध्द कायदेशिर तक्रार दिल्याने वरीलप्रमाणे चाकण पोलीस ठाणे अंतर्गत महाळुंगे पोलीस चौकीस गुरनं. ५१८ / २०२२ भादवि क ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल झालेनंतर महाळुंगे पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी हद्दीत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढुन, पेट्रोलिंग करुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश महाळुंगे पोलीस चौकी गुन्हे शोध पथकास दिले होते.
सदर आदेशाच्या अनुशंगाने दिनांक ०९/०४/२०२२ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती प्राप्त झाली की, चाकण पोलीस स्टेशन अंकीत महाळुंगे पोलीस चौकी गु.र.नं.५१८ / २०२२ भा.द.वि.क. ४५४,४५७.३८० मधील चोरी १) दिनेश अर्क बहादुर विका, वय २५ वर्षे, सध्याचा पत्ता खांडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी, ता. हवेली जि. पुणे मुळपता सहेरी अर्जुनी जि. बैलानी, नेपाळ २) विरेंद्र विश्वकर्मा सुनार, वय १९ वर्षे, रा. खांडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी, ता. हवेली जि. पुणे मुळपत्तासंडपुर, टिगापुर, जि. धनगाडे, नेपाळ ३) कौशल ऊर्फ भुरा नरेंद्र सिंह, वय २१ वर्षे, रा. खांडेवस्ती, भोसरी एमआयडीसी, ता. हवेली जि. पुणे मुळपत्ता मु.पो. निफाना ता. कालपे जि. जलोन, उत्तरप्रदेश यांनी केल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता
पॉलिमर प्रेसिजन कंपनी, आळंदी चाकण रोड लगत, कुरुळी ता. खेड जि. पुणे मधील चोरीस गेलेला एकुण ६६,१५० /- रुपये किंमतीच्या मशिनरी व इलेक्ट्रिक वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. दाखल गुन्हा भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०,३४
अटक आरोपींची नावे –