पिंपरी चिंचवड वार्ता:- ➡️ मा. पोलिस आयुक्त सो, श्री. कृष्ण प्रकाश साहेब यांच्या संकल्पनेतून पोलिस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे महिलांकरिता भरोसा सेल स्थापना करण्यात आले आहे.

➡️ भरोसा सेल, महाळुंगे पोलीस चौकी, पिंपरी चिंचवड व व्हायब्रंट HR ग्रुप, चाकण MIDC यांच्या वतीने दि. 12/04/22 रोजी दुपारी 03.00 वा. ते 05.00 वा दरम्यान CNH Industrial Pvt. ltd. Company, (New Holland), शिंदेगाव, ता. खेड, जि. पुणे येथे एमआयडीसी मधील विविध कंपनीमध्ये काम करत असलेल्या महिला यांच्या कामाच्या ठिकाणी तसेच घरी कौटुंबिक हिंसा व लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने शिबिर आयोजित करण्यात आले होते.

➡️ सदर शिबिरामध्ये 1) मा. सहा पोलिस आयुक्त सो, श्रीमती प्रेरणा कट्टे मॅडम, 2) श्री. संजय जोशी (consultant) महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास, 3) श्री अरविंद पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाळुंगे पोलीस चौकी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

➡️ सदर कार्यक्रमामध्ये चाकण एमआयडीसी मधील विविध कंपन्यांमधील सुमारे 150 महिला HR/Manager, POSH comiitte member, महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

➡️ काही पुरुष कामगार महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक रित्या टिप्पणी करणे, विनोद टोमने किंवा हावभाव केले जातात, संमती शिवाय आक्षेपहार्य रीतीने चिमटे काढणे किंवा स्पर्श केला जातो, बेबी, सेक्सी, हनी, डार्लिंग असे म्हटले जाते, दूरध्वनीवरून अश्लील मेसेज फोटो व व्हिडिओ पाठवले जातात, विशिष्ट एका व्यक्तीकडून वारंवार पाठलाग केला जातो अशा वेळी महिलांनी न घाबरता कंपनीमधील अंतर्गत तक्रार समितीकडे अथवा जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार करायची आहे, याबाबत माहिती देण्यात आली.

➡️ शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या महिलांना महिलांच्या संदर्भातील कायदे उदा. 1) Sexual harassment of women at workplace, 2) protection of children from sexual offences act (pocso act), 3) IPC 293, 294, 354, 376, 498 A, 504, 509, 4) IT act 67 5) Domestic voilance act यांची माहिती देण्यात आली आहे.

➡️ महाळुंगे पोलीस चौकी येथे कार्यरत असलेल्या भरोसा सेल, पोलीस काका/दीदी, बडी कॉप यांच्याबद्दल माहिती देऊन यामध्ये असलेल्या महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचे मोबाईल नंबर देण्यात आले.
