पुणे वार्ता:- संतोषनगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पदी श्रीमती कल्पना संजय कड पाटील व यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे विद्यमान चेअरमन बबन बळवंतशेठ कड पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागे साठी श्रीमती कल्पना संजय कड पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने यावेळी निवडणूक अधिकारी जे. बी.मुलाणी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी व्हाईस चेअरमन श्री प्रदीप भालचंद्र गायकवाड,तसेंच सर्व संचालक श्री शांताराम यशवंत भोसले, श्री अशोक गुलाब कड, श्री भाऊसाहेब नारायण जरे,सुनील रघुनाथ कडपाटील, बाळासाहेब मारुती कड, सुदाम बाजीराव कड, बळवंत नारायण गारगोटे, बळवंत केरू कड, निवृत्ती भिका चव्हाण, सौ.चंद्रकला शंकर जाधव, बाळासाहेब बबन विरकर, सर्व संचालक उपस्थित होते तसेच जे.बी. मुलाणी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन यांचा सर्वांच्या वतीने हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
