दर्यापूर तालुक्याचा पाणी प्रश्न लवकर मिटवा…अन्यथा आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यामधील अनेक गावांमध्ये गेल्या एक महिन्यापासून भीषण अशी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेला हाल सोसावे लागत आहेत व पाणीपुरवठा हा अर्धवट होत आहे. २१ मार्च २०२२ ला पाणीटंचाई संदर्भात वडनेर गंगाई येथील वंचित बहुजन आघाडीने निवेदन दिले होते पण त्यावर प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. सोमवारी ११ एप्रिल ला वंचित बहुजन आघाडी दर्यापूर तालुका यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

येणाऱ्या ४ ते ५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडी दर्यापूर तालुकाध्यक्ष संजीवन खंडारे यांनी दिला. यावेळी जिल्हा महासचिव साहेबराव वाकपांजर, जिल्हा सचिव अतुल नळकांडे, तालुका संघटक संतोष बगाडे , महासचिव गौतम डोंगरे, उपाध्यक्ष पवन ढोके, सौरभ कोकाटे, प्रियेष वानखडे, यश कांबळे, चेतन कांबळे, गौरव वानखडे, उत्कर्ष चौरपगार, दर्शन गावंडे, त्रिषरण गावंडे, शुभम गावंडे, शीलवान गावंडे, विकी रायबोले, आदी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!